टाटा मोटर्स हे नाव भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात खूप मोठं नाव आहे. गेल्या काही वर्षांपासून टाटा आपल्या ग्राहकांसाठी काहीतरी वेगळं करण्याचा सतत प्रयत्न करत असते. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आता टाटा हॅरियर ईव्ही (Tata Harrier EV) बाजारात येत आहे. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही केवळ पर्यावरणपूरक नाही, तर ती स्टाईल, तंत्रज्ञान आणि परफॉर्मन्सच्या बाबतीतही एक पाऊल पुढे आहे.व ही इलेक्ट्रिक एसयूव्ही 4x4 असणार आहे. आपण टाटा हॅरियर ईव्हीच्या फीचर्स व , डिझाईनबद्दल जाणून घेऊया.
टाटा हॅरियर ईव्ही बद्दल जाणून घ्या
टाटा हॅरियर ही गाडी आधीच भारतीय लोकांच्या मनावर राज्य करत आहे. कारण तिचे स्टायलिश डिझाईन, आरामदायी इंटिरियर आणि छान परफॉर्मन्स यामुळे ती लोकांची आवडती आहे. पण आता टाटा मोटर्सने या लोकप्रिय एसयूव्हीला इलेक्ट्रिक मध्ये आणण्याचा निर्णय घेतला आहे. Tata Harrier Ev ही गाडी 2025 मध्ये लॉन्च झाली आहे आणि ती टाटाच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या मालिकेतील एक मोठी एस यु व्ही ठरणार आहे. ही गाडी टाटाच्या नवीन "acti.ev" आर्किटेक्चरवर आधारित आहे, ज्यामुळे ती केवळ शक्तिशालीच नाही तर अधिक आरामदायी बनते.
Harrier Ev ही फक्त एक गाडी नाही, तर ती पर्यावरणाशी जुळवून घेण्याचा आणि भाविषयाच्या दृष्टिकोनाकडे वाटचाल करण्याचा टाटाचा एक मोठं पाऊल ठरणार आहे. जर तुम्ही एस यु व्ही इलेक्ट्रिक वाहन घेण्याचा निर्णय घेत असाल, तर ही गाडी तुमच्या दारात नक्कीच असायला हवी.
➤ टाटा हॅरियर ईव्हीची फीचर्स
१. डिझाईन आणि लूक
Tata Harrier Ev ची डिझाईन हे तिचे पहिले आकर्षणाच कारण ठरणारं आहे. ही गाडी जुन्या हॅरियरच्या डिझाईनवर आधारित आहे, पण यात इलेक्ट्रिक वाहनांसाठी खास बदल करण्यात आले आहेत. समोरच्या बाजूला बंद ग्रिल, स्लीक एलईडी डीआरएल आणि नवीन बंपर डिझाईन यामुळे ती मॉडर्न आणि स्टायलिश दिसते. मागच्या बाजूस नवीन एलईडी टेललॅम्प्स आणि संपूर्ण रुंदीवर पसरलेली लाईट बार तिला प्रीमियम लूक देतात. याशिवाय, नवीन ड्युअल-टोन अलॉय व्हील्स तिच्या लूक्समध्ये भर घालतात.
२. बॅटरी आणि रेंज
हॅरियर ईव्हीत 75 kWh ची बॅटरी असण्याची शक्यता आहे, जी एकदा चार्ज केल्यावर ४००ते ५०० km (Range) जास्त चालू शकते. यामुळे दूरचा प्रवास देखील सहज करू शकता. टाटाने बॅटरी व रेंजबद्दल अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही, पण सूत्रांनुसार ही गाडी डबल-मोटर सेटअपसह असणार आहे. ज्यामुळे ती ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) आहे. याचा अर्थ, असा आहे कि पावर च्या बाबतीत कसलीही कमतरता भासणार नाही. तुम्हाला कोणत्याही रस्त्यावर आणि हवामानात उत्तम परफॉर्मन्स मिळेल.
![]() |
Tata Harrier Ev. Know more about this car |
Read more सरकार देतंय तुमच्या शेतात विहीर बांधण्यासाठी 4 लाख रुपये. आधिक माहितीसाठी जाणून घ्या.
३. परफॉर्मन्स आणि पॉवर
हॅरियर ईव्हीमध्ये ५०० (Nm) न्यूटनमिनीटरचा चा टॉर्क मिळु शकतो, ज्यामुळे ती अधिक शक्तिशाली बनते. डबल-मोटर सेटअपमुळे ती चारही चाकांना पॉवर पुरवते, ज्यामुळे ऑफ-रोड ड्रायव्हिंगसाठीही ती उत्तम ठरणार आहे. जुनी डिझेल हॅरियरच्या तुलनेत ही इलेक्ट्रिक हॅरियर अधिक स्मूथ आणि जलद असणार, कारण इलेक्ट्रिक मोटर्स त्वरित टॉर्क देतात.
४. इंटिरियर आणि कम्फर्ट
हॅरियर ईव्हीचे इंटिरियर हे या वेळेस प्रीमियम आणि आरामदायी आहे. यात १२.३ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, १०.२५ इंचाचे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर व ड्युअल-टोन अपहोल्स्ट्री आहे. पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि ड्युअल-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये तुमचा प्रवास अधिक सुखकर व आरामदायी बनवतात. याशिवाय, वायरलेस चार्जिंग, टाइप-सी फास्ट चार्जर आणि जेबीएलचा १०-स्पीकर साउंड सिस्टम तुम्हाला लक्झरीयस प्रवासाचा अनुभव देणार.
५. सेफ्टी फीचर्स
टाटाच्या गाड्यांचा सेफ्टीचा रेकॉर्ड नेहमीच अग्रेसर राहिला आहे, आणि हॅरियर ईव्हीही त्याला अपवाद नाही. यात तुम्हाला ७ एअरबॅग्ज, लेव्हल २ ADAS (अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम), ३६० डिग्री कॅमेरा, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन आणि लेन कीपिंग असिस्ट यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
६. टेक्नॉलॉजी आणि कनेक्टिव्हिटी
हॅरियर ईव्हीमध्ये यावेळेस अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलेला आहे. यात तुम्हाला व्हॉईस कमांड्स, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, ओव्हर द एअर (OTA) अपडेट्स आणि व्हेइकल टू लोड (V२L) आणि व्हेइकल टू-व्हेइकल (V२V) चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे .यावेळेस (Summon) समन मोड हे एक खास फीचर देण्यात आले आहे, ज्यामुळे तुम्ही गाडीला की फॉबने कंट्रोल करू शकता, म्हणजे तुम्ही गाडीत न बसताही.
➤ टाटा हॅरियर ईव्ही तुम्ही का घ्यावी ?
प्रथमतः पर्यावरणपूरक निवड असणार जर का हि गाडी तुम्ही घेत असाल तर ?
हॅरियर ईव्ही ही पूर्णपणे इलेक्ट्रिक गाडी आहे, म्हणजेच ती पेट्रोल किंवा डिझेलवर अवलंबून असण्याची गरज नसणार . यामुळे कार्बनचे उत्सर्जन कमी होणार व पर्यावरणाला फायदा पोहोचतो. जर तुम्हाला पर्यावरणाच्या बाबतीत काळजी असेल, तर ही गाडी तुमच्यासाठी उत्तम पर्याय असणार आहे.टाटा हॅरियर ईव्हीची किंमत साधारणता 25 ते 30 लाख रुपये (एक्स-शोरूम) असण्याची शक्यता सूत्रांकडून मिळाली आहे.